Our Philosophy:

" गुणवत्तापूर्ण बालसंगोपन प्रत्येक मुलाचा मूलभूत हक्क ! "
" Qualitative Child Care is the fundamental right of every child. "

About Aanandghar

आनंदघर - बाल संगोपन केंद्र (पाळणाघर) ची सुरुवात १ नोव्हेंबर २०१५ पासून झाली. खूप दिवसांपासून मनात होतं की आपण एक चांगलं बालसंगोपन केंद्र पाळणाघर आणि शाळा सुरू करावी. त्यातील आव्हाने लक्षात घेता ते मी पुढे ढकलले. साधारणपणे 2006 पासून बाल संगोपन आणि शिक्षण या विषयाचा अभ्यास सुरू झाला.

त्यात प्रामुख्याने मुलांच्या वाढीचे टप्पे शारीरिक-मानसिक- सामाजिक, विकास, आहार मुलं कसं शिकतं अशा विविध विषयांवर वाचन, लेखन झालं एक पायाभरणी झाली. त्यात ‘स्नेह’ बालसंगोपन केंद्र (पाळणाघर) जवळून बघता आलं. अभ्यासता आलं. जे काही मी बाळ संगोपनावर वाचत होते त्याची अंमलबजावणी कशी करायची हे तिथे जाणून घेता आलं. मग मात्र २०१०-२०११ मध्ये 'स्नेह' सारखं बाल संगोपन केंद्र (पाळणाघर) सुरु करावं असं वाटलं. त्यानुसार काही पावलं उचलली परंतु काही कारणांनी ते थांबवावं लागलं.

आज ५ वर्षांनी तेच अधुरं काम पूर्ण करण्याच्या दृष्टीनं हे पाहिलं पाऊल उचलत आहे. तसंच, अवकाश निर्मिती (विविध सामाजिक विषयांवर माहितीपट बनविणारा गट) सोबत काम करतांना विविध क्षेत्रातील लोकांना भेटणं, चर्चा, मुलाखती, वाचन, चिंतन, मनानं असं सर्व घडत होतं. विचार व कृती ह्या दोन्ही गोष्टी जवळून अभ्यसता आल्या. जाणून घेता आल्या. त्याचे मनावर खोलवर संस्कार रुजले. प्रामुख्याने शिक्षण ह्या विषयावर बरेच माहितीपट बनवले गेले. बालसंगोपन आणि शिक्षण ह्या विषयाची व्याप्ती, महत्व लक्षात आलं. ह्या सर्व गोष्टींचा परिपाक म्हणून सहजतेने माझंही कार्यक्षेत्र ठरत गेलं. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाची काय स्थिती आहे, काय बदल व्हायला हवे इत्यादी सर्व गोष्टींचे मंथन झाले आणि इथेच कायदा आणि शिक्षण याचा एकत्रित अभ्यास सुरु झाला. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित शिक्षण व्यवस्था , शिक्षण हक्क कायदा व अंमलबजावणी यासंबंधी विचार करताना मुलांच्या वाढीत, संगोपनात प्रत्यक्ष सहभागी होणं, पालकांशी संवाद साधणं अत्यंत महत्वाचं वाटतं. वैचारिक लढा आणि प्रत्यक्ष काम करण या दोन्हीही गोष्टी सकारात्मक बदलासाठी आवश्यक आहेत. म्हणून या बाल संगोपन केंद्रात संगोपनाच्या मूलभूत गोष्टी तर असतील शिवाय जे काही आकलन गेलया ९-१० वर्षांत बालसंगोपन आणि शिक्षण या विषयावर झालं. यात प्रामुख्यानं स्नेह, ग्राममंगल, सृजन आनंद, अक्षर नंदन, अब नॉर्मल होम आणि इतरही नवे शैक्षणिक विचार व कृती अभ्यासली, काही ठिकाणी प्रत्यक्ष सहभागी झाले. त्याचबरोबर मानसशास्र, बाल -मानसशास्त्रही अभ्यासलं. त्याचा उपयोग सकारात्मक बदलासाठी करण्याचा हा प्रयत्न आहे.
-छाया गोलटगावकर 

Anandghar - Child care centre (observatory) started on 7th November. For a long time, I thought we should start a good childcare centre, a nursery and a school. Considering the challenges, I pushed it forward.

Generally, the study of child care and education began in 2006. It consisted mainly of reading, writing, and writing on various topics such as physical, mental, social, development, and how children learn. One could see the 'affection' child care centre nearby. Could study. There I was learning how to implement everything I was reading on baby care. Then it was thought that starting a child care centre like 'affection' in 3-5. Some steps were taken accordingly, but for some reason they had to be stopped.
Today, he is taking steps to complete the same unfinished work after 3 years. Also, meeting with people from different fields, talking, interviewing, reading, meditating, meditating and working with leisure productions. Both thoughts and actions came to a close. Could be learned. His heart was deeply rooted.Considering the Indian Constitution's expected education system, Right to Education Act and implementation, it is very important for the children to be involved in the upbringing, to participate directly in the care and to communicate with the parents. Both ideological combat and real work are essential for positive change. So while this child care centre has the basics of rearing, everything that has been learned in the last 2-3 years is about child care and education. It mainly studied affection, grammangal, creativity, joy, akshar nandan, ab normal home and other new educational thoughts and activities, participated directly in some places. He also studied psychology, child psychology. This is an attempt to use it for positive change.
-Adv. Chhaya Golatgaonkar

Director's Desk

Adv. Chhaya Golatgaonkar

  • नमस्कार,
मी अॅड. छाया गोलटगावकर आनंदघर बालसंगोपन केंद्र, (पाळणाघर) लर्निंग अँड रिसर्च सेंटर ची संस्थापक -संचालक...
खरं तर मी वकील आहे. काही काळ कोर्टात वकिली केली, क्रिमिनल लॉयर म्हणून काम बघितलं, काही काळ लॉ कॉलेजमध्येही शिकवलं. गेल्या १०-११ वर्षात कायदा, शिक्षणशास्त्र, मानसशास्त्र इत्यादी सामाजिक शास्त्रांचा एकत्रित अभ्यास करत आहे. या अभ्यासातूनच कायदा व शिक्षण या विषयावर काम सुरू केलं. त्याचाच एक भाग म्हणजे आनंदघर... पहिल्या दहा वर्षातील मुलांची जडण-घडण महत्त्वाची... म्हणून ECCE- Early Childhood Care & Education महत्वाचं, यात बालविकासाचे, वाढीचे टप्पे लक्षात घेऊन, बालमानसशास्त्र शिक्षणशास्त्राची दखल घेऊन कार्यरत आहे, या आधारावर आनंदघरची रचना झाली आहे... आनंदघर सुरू होऊन ४ वर्षे झालीत. या चार वर्षातील काही काही महत्वाची कामे--
* बालहक्क विषयी व्याख्यान, चर्चासत्र 
* पालकनीतीचा पाळणाघर विशेषांक 
* बाबा आमटे यांच्या आनंदवनात केलेलं काम 
* त्याचबरोबर फिनलँड या युरोपीय देशात आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये आनंदघरच्या कामाविषयी केलेलं प्रेझेन्टेशन...
 या सर्व बाबी आनंदघरच्या कामातील मनाचे तुरे आहेत... याशिवाय,
* पुण्यातील व पुण्याबाहेरील काही शाळांसोबत, शिक्षकांसोबत, पालकांसोबत ECCE चे प्रशिक्षण वर्ग सुरु आहेत... 
या कामाविषयी लेखमाला वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाली आहे...
आनंदघरच्या कामासोबतच--
विविध सामाजिक विषयांवर बनवल्या जाणाऱ्या माहितीपट डॉक्युमेंटरी फिल्ममध्ये माझा सहभाग असतो, तसेच, कायदेशीर सल्लागार व समुपदेशक Legal Adviser & Counsellor या नात्याने, सामंजस्याने वादविवाद, कोर्ट केसेस सोडविण्यासाठी प्रयत्नशील असते... 
धन्यवाद!

Links: 

Advisors, Supporters & Volunteers

Advisors:

* Mrs. Anagha Adoni, Psychologist, Ab-Normal Home, Trustee!
* Mr. Sarang Golatgaonkar, Architect & IT Professional!
* Mr. Sameer Shipurkar , Documentary Filmmaker, Founder- Director at  Avkash Nirmitee!
* Mr. Pankaj Mithbhakre , Child Psychologist, Ab-Normal Home, Founder!

Supporters:

* Mrs. Jyoti Kulkarni, Accounting
* Mrs. Prerna Date, Housewife
* Mr. Nayan Barhate - Artist
* Ram Shewadikar - Editor - Dainik Udyacha Marathwada
* Dr. Lalchandani
* Mr. Hedeo - Retired

Volunteers:

* Mrs. Sneha Bhoyer - HR Department (IT)
* Mrs. Urmil Bal - Accounting
* Mrs. Sampada Pardeshi - Teacher
* Mrs. Dipali Potdar - Teacher
* Mrs. Vaishali Karlekar - Editor & Writer (Nitin Prakashan)
* Mrs. Vidya More - Freelancer

Facilitators & Assistant Teachers

Facilitators:

* Pallavi Shirke
* Sanika
* Arati Mahadik
* Ashwini Gujar
* Manasi Nimbalkar
* Swapnali Patil
* Aishwarya Kaprekar (Music Teacher)
* Mugdha Muley (Dance Teacher)
* Vaishali (Khelghar Student)
* Mrs. Deshpande Aajji (Songs & Storyteller)

Assistant Teachers:

* Pushpa Marsone
* Mankavati (Shubhangi) Gambhire
* Suva Tulsaram
* Sarita Konde
* Vaishali Ghadge
* Ashwini Pawar
* Urmila Gopale

© Copyright 2020 Aanandghar - All Rights Reserved