Child care and Education

Aanandghar Child Care (Balsangopan Kendra), Learning and Research Center, formally opened on 1st November, 2015. But the journey began in 2006. It has all started with the study, training, workshops on Early Childhood Care and Education (ECCE) since 2006. It resulted in building a foundation, mainly on children's developmental stages, physical psychological, social, emotional, and how children learn. The importance and the scope of child care and education, was realised. The study also made it clear that what is the status of education at the national and international level, what should change. It has all been churned and this is where the combined study of Law (Especially, The Indian Constitution, The Right to Education Act) and Education has started. I believe both ideological fight and actual work are necessary for a positive change. 
Two important things-
1. Aanandghar is a part of study of Law and Education (Especially, ECCE Early Childhood Care and Education). 
2. Aanandghar is not just a child care center but a movement of Child Rights.

Objectives and Special Features of Aanandghar- 
* Trained staff 
* Child Centric, child friendly atmosphere. 
* Healthy (Love, Happiness, Trust, Freedom, Security) environment of Aanandghar helps for all round development of children. 
* Creativity, imagination, thinking ability, problem solving. 
* Cognizance of child Psychology. 
* Quality in child care. 
* Nutritious food prepared in our kitchen 
* Conscious efforts to protect childhood. 
* Emphasis on emotional stability of a child, parent and family. 
* Supporting system for parents. 
* Emphasis on staff training, ongoing training throughout the year.
* Celebrations : Festivals , Birthday 
* Annual function 
* Strict Legal actions for child abuse. 
                
Workshops conducted by experts on the topics like arts and crafts, paintings, traditional games, cooking, pottery, making Ganesh Idol, Science toys, Robotics Assembly, Scratch Programming. It is a process of learning by doing.

With continuous demand from parents, Infant care section started at Aanandghar. We think it's a need of the hour as an increasing number of women are struggling for their dreams to come true. 
Age group- 6 months - 2 years (Infant) 
Age group- 2 yrs - 12 yrs.

बालसंगोपन केंद्र
(पाळणाघर)

‘आनंदघर -बाल संगोपन केंद्र (पाळणाघर)लर्निंग अँड रिसर्च सेंटर’ ची सुरुवात १ नोव्हेंबर, २०१५ पासून झाली. आनंदघर सुरू करण्यापूर्वी खूप दिवसांपासून मनात होतं की आपण एक चांगलं बाल संगोपन केंद्र (पाळणाघर) आणि शाळा सुरु करावी. त्यातली आव्हाने "लक्षात घेता ते पुढे ढकलले. साधारणपणे २००६ पासून बालसंगोपन आणि शिक्षण या विषयाचा अभ्यास सुरु झाला. त्यात प्रामुख्यानं मुलांच्या वाढीचे टप्पे, शारीरिक-मानसिक-सामाजिक विकास, आहार, मुल कसं शिकतं अशा विविध विषयांवर वाचन, लेखन झालं, विविध प्रशिक्षण केली, एक पायाभरणी झाली. बालसंगोपन आणि शिक्षण या विषयाची व्याप्ती, महत्त्व लक्षात आलं. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर शिक्षणाची काय स्थिती आहे, काय बदल व्हायला हवे इत्यादी सर्व गोष्टींचे मंथन झाले आणि इथेच कायदा आणि शिक्षण (Law and Education) चा एकत्रित अभ्यास सुरु झाला. भारतीय राज्यघटनेला अपेक्षित शिक्षण व्यवस्था, शिक्षण हक्क कायदा (RTE Act) व अंमलबजावणी यासंबंधी विचार करताना मुलांच्या वाढीत, संगोपनात प्रत्यक्ष सहभागी होणं, पालकांशी संवाद साधणं अत्यंत महत्त्वाचं वाटलं. वैचारिक लढा आणि प्रत्यक्ष काम करणं या दोन्हीही गोष्टी सकारात्मक बदलासाठी आवश्यक आहेत. म्हणूनच या बाल संगोपन केंद्रात (पाळणाघर) संगोपनाच्या मुलभूत गोष्टी तर असतील शिवाय जे काही आकलन गेल्या ९-१० वर्षात बालसंगोपन आणि शिक्षण या विषयावर झालं, त्याचबरोबर मानसशास्त्र, बाल-मानसशास्त्रही अभ्यासलं, त्याचा उपयोग सकारात्मक बदलासाठी करण्याचा हा प्रयत्न आहे.

आनंदघरची उद्दिष्टे आणि वैशिष्ट्ये :-
* बालककेंद्री.
* विकासास पोषक वातावरण देण्याचा प्रयत्न.
* सुरक्षितता व प्रेम देण्याचा प्रयत्न.
* चांगल्या सवयी अंगी बाणवण्याचा प्रयत्न.
* सृजनशीलता, कल्पनाशक्ती, विचारशक्ती, समस्यापूर्ती इ. 
* विकासाचे पैलू लक्षात घेऊन त्याप्रमाणे कृतींचे नियोजन.
* गुणवत्तापूर्ण बाल संगोपनाचा प्रयत्न.
* पौष्टीक आहार आमच्या स्वयंपाक घरात बनवला जातो. 
* सण -उत्सव साजरे करणं 
* स्नेहसंमेलन 
* प्रशिक्षित शिक्षक-ताई, मदतनीस-मावशी 
* बालमानसशास्त्राची दखल घेऊन काम केलं जात. 
* मेंदू संशोधनाची दखल घेऊन काम केलं जात. 
* वैविध्यपूर्ण कार्यशाळा, शिबिरं आयोजित केली जातात. 

आनंदघरी २ ते १२ वर्षे वयोगटातील मुलांना प्रवेश दिला जायचा. २०१९ पासून पालकांच्या सातत्य-पूर्ण मागणी नुसार ६ महिने ते २ वर्षे या वयोगटातील मुलांनाही प्रवेश दिला जात आहे. बदलत्या काळाची ही मागणी आहे. आजच्या कुटुंबाला सपोर्टींग सिस्टिमची गरज आहे. विशेषतः आई पालकाला स्वतःचं स्वप्न, ध्येय पूर्ण करण्यासाठी पर्यायी पालकत्वाची गरज भासते. हे ओळखून, समजून, उमजून आनंदघर मुलांचं पर्यायी पालकत्व स्वीकारत. 
आनंदघरच्या स्वच्छ, सुरक्षित, निरोगी वातावरणात पालक निर्धास्तपणे मुलांना सोडून आपलं काम करू शकतात. 

Special Features 

of Child Care Center (Day Care)

Unique Activities

Exploring songs and Stories

Playing with Clay and Water

Playing with Sand

Building own Stories

Free Play

© Copyright 2020 Aanandghar - All Rights Reserved